येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नेवासे (अहिल्यानगर) - नेवासे तालुक्यातील चांदा (Chanda) गावात रविवारी दुपारी गावठी पिस्तुलातून एका युवकावर बेछूट गोळीबार (Firing) करण्यात आला. यात शाहीद राजमहंमद शेख (वय २४, रा. चांदा) (Shaheed Rajmohammad Shaikh) हा युवक जागीच ठार (Shot Dead) झाला.
![]() |
| छायाचित्र : प्रतिकात्मक |
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार जुना चांदा ते बऱ्हाणपूर रोडवर एका शेतात घडला. चांद्यात रविवारी चारीजवळ असलेल्या एका वस्तीवर कार्यक्रम आयोजित केलेला होता. तेथे शाहीद आलेला होता. त्याच्यावर हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून (Revolver) गोळीबार केला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे (Crime Branch) पोलिस पथक, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सोनई पोलिस ठाण्याचे (Sonai Police Station) सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी व सहकारी, तसेच शनिशिंगणापूर (Shanishingnapur) पोलिस दलाने घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, मृत शाहीद रविवारी दुपारी गावातील कार्यक्रमात आल्यानंतर त्याचे हल्लेखोरांसोबत वाद (Controversy) झाले. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले. त्यात शाहीद ठार झाला. या घटनेनंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) नेण्यात आले.
त्याच्या मृत्यूची माहिती समजल्याने जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर चांदा गावात पोलिस बंदोबस्त (Police Force) तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक (Squad) रवाना करण्यात आले आहे.
नेमके कारण काय? (Cause of Attack) - शाहीद याच्यावर आरोपींनी २ ते ३ गोळ्या फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, त्याचे हल्लेखोरांसोबत वाद कशावरुन झाले, तसेच त्याच्या खुनाचे नेमके कारण (Reason) काय, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत.
पोलिस अधीक्षक घटनास्थळी - चांद्यात गोळीबारात युवक ठार झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या प्रकाराची सखोल माहिती जाणून घेत त्यांनी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनाही समांतर तपासाच्या सूचना केल्या आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच..
(अधिक माहितीसाठी हे पेज रिफ्रेश करत रहा)

