येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - राज्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक (Cheating) व लैंगिक शोषणाचे (Physical Assault) प्रकार वाढत असतानाच अहिल्यानगरमध्ये एक खळबळजनक गुन्हा (Crime) उघडकीस आला आहे. सोशल मीडियावरील (Social Media) ओळखीचा गैरफायदा घेत, खासगी फोटोच्या आधारे भावनिक ब्लॅकमेल (Blackmail) करत एका २१ वर्षीय तरुणीला पुणे जिल्ह्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती शारीरिक अत्याचार (Rape) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
![]() |
| छायाचित्र : प्रतिकात्मक |
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live in Relationship) नावाखाली कागदावर जबरदस्ती सही (Signature) करून घेत फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणीने (Victim) केला आहे. कर्जत तालुक्यातील मूळ रहिवासी व सध्या अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात वास्तव्यास असलेल्या तरुणीच्या फिर्यादीवरून कर्जत तालुक्यातील एका तरुणाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) बुधवारी (७ जानेवारी) रात्री गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणीची आरोपीशी इन्स्टाग्रामद्वारे (Instagram) ओळख झाली होती. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. मात्र आरोपीने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवण्यास सुरुवात केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी नातं तोडलं. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपीकडे तरुणीचे खासगी फोटो (Private Photos) असल्याचे समोर आले.
हे फोटो डिलीट (Delete) करण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला २९ डिसेंबर २०२५ रोजी तारकपूर बसस्थानकावर (Tarakpur Bus Stand) बोलावले. तेथून कारमध्ये बसवून लग्नाचे खोटे आश्वासन (Promise) देत भावनिक दबाव टाकत तिला पुणे जिल्ह्यातील आळंदी व नंतर मुळशी येथे नातेवाईकांच्या घरी नेण्यात आले. तेथे एका कागदावर जबरदस्तीने सही करून घेतल्यानंतर तो कागद लिव्ह-इन रिलेशनशिपचा असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली.
त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी आरोपीने पीडितेवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, असा गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा (Women Security) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

