येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नेवासे (अहिल्यानगर) - नेवासा तालुक्यातील चांदा (Chanda) येथे उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून थेट गोळीबार (Fire) करत शाहिद शेख (वय २४) या तरुणाची हत्या (Murder) केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शेळी-बोकड खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील २५ हजार रुपयांच्या उधारीवरून शाहिद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा (Offence Registered) दाखल झाला आहे.
| Image is not original : AI Generated |
याप्रकरणी शाहीदचा चुलत भाऊ यासीन इब्राहिम शेख (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, शाहिद शेख (Shahid Shaikh) हे शेळी-बोकड विक्रीचा व्यवसाय करत होते. या व्यवहारातून अक्षय बाळू जाधव याच्याकडे २५ हजार रुपये येणे बाकी (Payment Due) होते. हे पैसे मिळावेत म्हणून शाहिद यांनी मागील महिन्यात अक्षय जाधव (Akshay Jadhav) याच्याकडे तगादा लावला असता त्यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान, रविवारी दुपारी सुरज लतीफ शेख यांच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तेथे बोकड कापण्यासाठी शाहिद शेख यांना बोलावले होते. सायंकाळी शाहिद शेख, सुरज लतीफ शेख (Suraj Latif Shaikh) आणि अक्षय बाळू जाधव यांच्यात पुन्हा वाद उफाळला. हा वाद इतका विकोपाला गेला की शाहिद याच्या छातीवर बेछूट गोळीबार करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यासीन शेख घटनास्थळी दाखल झाले. तेथे शाहिद याच्या छातीवर गोळीबार झाल्याचे त्यांना दिसून आले आणि ते जागीच मृत्युमुखी (Shot Dead) पडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ सोनई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ॲम्बुलन्सद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी ( Post Martem) नगरच्या जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) पाठवला.
याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात सुरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांच्याविरोधात गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलमासह (Arm Act) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी (API Vijay Mali) हे करत आहेत.
उधारीच्या पैशावरून थेट गोळीबाराचा थरार व एका युवकाच्या हत्येपर्यंत गेलेल्या या घटनेमुळे चांदा परिसर हादरला आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणालाही अटक (Arrest) झालेली नसून आरोपींच्या (Suspected Accused) शोधासाठी पोलिस पथक रवाना केलेले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (Crime Branch) एक पथकही आरोपींचा समांतर शोध घेत आहे.
ही बातमी वाचा : चांद्यात गावठी पिस्तुलातून गोळीबार, २४ वर्षीय युवक ठार
ही बातमीही वाचा : चांदा गोळीबाराचा तपास नेमका 'कोणत्या' दिशेने? कायद्याचा 'धाक' संपतोय का?
