अहिल्यानगर - तालुका हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. नगर-दौंड रोडवरील अरणगाव परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार क्लब आणि ऑनलाईन बिंगो (Online Bingo) अड्यावर छापा टाकत पोलिसांनी एकूण 9 आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत 2 लाख 1 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे (Crime Branch) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे 11 जानेवारी 2026 रोजी ही धडक मोहीम राबवण्यात आली. तिरट जुगार क्लबवरील कारवाई : नगर–दौंड रोडवरील जय मल्हार गॅरेजजवळील पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा हार-जीत जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पंचासमक्ष झडती घेतली असता खालील आरोपी मिळून आले.
पकडलेल्या आरोपींची नावे :
- धिरज राजेंद्र संदलसे (वय 33) शिवाजीनगर, केडगाव
- नासीर गुलाब खान (वय 58) मुकुंदनगर
- महेंद्र शिवानंद भांबळ (वय 33) सिद्धार्थनगर
- रामदास एकनाथ थोरे (वय 70) अरणगाव
- ज्ञानेश्वर धनराज गिरवले (वय 48) अरणगाव
- संजय बाळासाहेब रासकर (वय 50) हंगा, पारनेर
- पोपट मुरलीधर पवार (वय 58) साकत
जप्त केलेला मुद्देमाल :
- रोख रक्कम : ₹12,360
- 6 मोबाईल फोन : ₹1,82,260
- एकूण – ₹1,94,620
ऑनलाईन बिंगो जुगार अड्यावर कारवाई : त्याच परिसरात सुरू असलेल्या बिंगो नावाच्या ऑनलाईन जुगारावर कारवाई करत पोलिसांनी एक आरोपी पकडला आहे. गणेश बाबासाहेब घुले (वय 22) लोढे मळा, केडगाव, असे त्याचे नाव आहे.
जप्त मुद्देमाल :
- बिंगो जुगार साहित्य व रोख रक्कम
- एकूण - ₹6,740
याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही कारवाईत एकूण
- एकूण आरोपी : 9
- एकूण जप्त मुद्देमाल : ₹2,01,360
- कारवाई करणारे पथक : स्थानिक गुन्हे शाखा
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर व सातत्यपूर्ण कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत, असा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.
