सुदैवाने जीवितहानी टळली, संसारपयोगी साहित्य जळून खाक
नाशिक : शहरातील पंचवटीती मधील गौडवाडी येथे लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. वेळीच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गौडवाडी मधील झोपडीला आग लागली. काही क्षणात आगीने शेजारील झोपडीला देखील विळख्यात घेतले.
परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागास माहिती दिल्याने विभागाचे लिडिंग फायरमन एस. के. कानडे, डी. आर. गाडे, फायरमन एस. एल. पाटील, पी. आर. पगारे, एन. पी. म्हस्के, एस. बी. भालेराव, जी. एस. अहिरे, आर. के. मानकर आदींनी पाण्याचा फवारा करीत आग आटोक्यात आणली. पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.