'राष्ट्रवादी'ची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर
नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मजबुतीसाठी सामाजिक कार्यासोबत पक्षवाढीसाठी सक्रीय असलेल्यांना नवीन कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. सक्रीय व जोमात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व स्थानिक नेत्यांशी विचारविनिमय करून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, सहा चिटणीस, सहा संघटक हि पदे असून तीन विधानसभा अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांची निवड कार्यकारिणीत करण्यात आल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे.