अहमदनगर - नगर तालुक्यातील इमामपूर येथे सह्याद्री डोंगररंगांच्या कुशीत एका खिरणीच्या झाडाखाली योगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला डोंगररांगा आहेत. याच डोंगरातून मार्ग काढत जाणारा एक धबधबा शिवभक्तांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.
नगर येथील ट्रेककॅम्प या संस्थेचे संचालक श्री विशाल लाहोटी सर यांनी नुकतेच या धबधब्याला आपल्या कॅमेऱ्यात शुट केले आहे. या धबधब्याचे आणि सभोवतालच्या हिरव्या निसर्गाचे सौंदर्य त्यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केले आहे.
या व्हिडीओत दिसणारा परिसर अहमदनगर औरंगाबाद हायवेपासून उत्तरेकडे अवघा अडीच किलोमीटर अंतरावर आहे. नुकत्याच बरसून गेलेल्या श्रावणसरींमुळे या डोंगर-दर्यात छोटे ओढे तयार झाले आहेत. तसेच धबधबेही दिसत आहेत. हा परिसर नयनरम्य आहे.