महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमक्या येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून त्यांना धमकीचे मेसेज येत आहेत. मांजरेकर यांनी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. 


हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते. तसेच हे मेसेज अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या टोळीकडून येत असल्याची माहिती समोर येत आहे. अबू सालेम हा सध्या तळोजा तुरुंगात आहे. या धमकीप्रकरणी अबू सालेमकडे तुरुंगात जाऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, महेश मांजरेकर खंडणी प्रकरणात रत्नागिरी येथून एकाला अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा अबू सालेम अथवा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नसल्याचे समजते.

बॉलीवूडमध्ये यापूर्वीही अनेक अभिनेते, दिग्दर्शकांना अंडरवर्ल्डकडून धमक्या आलेल्या आहेत. खंडणीसाठी धमकी येण्याचे प्रकार नवीन नाहीत. असे असले तरी पोलिसांंनी मांजरेकर यांना आलेल्या धमक्यांची बाब अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. याबाबत कसून तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !