अहमदनगर - पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात सातारा जिल्ह्यातील 'कास पठारा'चे. या पठारावर पावसाळयात हिरवेगार गवत तर आहेच. पण असंख्य प्रकारची फुलेही आढळून येतात. असेच एक पठार सध्या अहमदनगर जिल्ह्यात फुलले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात अकोळनेर गाव आहे. नगरपासून अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावर हे गाव आहे. या गावात अनेक वैशिष्ट्य आहेतच. त्यापैकीच एक म्हणजे हे पठार. दर पावसाळ्यात हे पठार हिरवागार शालू नेसते.
यंदाही अकोळनेरचे पठार हिरवेगार झाले आहे. या पठारावर एक मंदिर देखील आहे. आणि पावसामुळे येथे गर्द हिरवे गवत उगवले आहे. तसेच या पठारावर विविधरंगी फुले देखील फुललेली आहेत. हे पठार सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. (व्हिडीओ सौजन्य : दत्ता इंगळे, अहमदनगर)