अहमदनगर - पाइपलाईन रोडवरील क्रुष्णानगर येथील माजी सैनिकांची मुलगी डाँक्टर गुणप्रिया हिने गणपती समोर रेखाटलेल्या रांगोळीतुन जनतेला खुप सुंदर संदेश दिला आहे. या रांगोळीमधुन तिने गणपती बाप्पाने कोरोना विषाणुला लाथ मारुन या महामारीचे संकट बाप्पा तुच दुर कर असा संदेश दिला आहे.
गुणप्रिया हिने आपल्या रांगोळीतून हा सुंदर संदेश देऊन डाँक्टर पोलिस सफाईवाला यांना दिलसे thank you असाही सुंदर संदेश रेखाटला आहे. या रांगोळीमधुन मास्कचा वापर करा.घरीच रहा कामानिमीत्तच बाहेर पडा असे आवाहन देखील तिने केले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व लोक घरात असताना गुणप्रिया हिने आपल्या कलागुणांचे छान प्रदर्शन केले आहे. गुणप्रिया हिच्या रांगोळीचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.