उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
साधेपणानेच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
पुणे - काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावर्षी आषाढी वारी, दहीहंडी, बकरी ईद आदी सण साधेपणाने साजरे करण्यात आले. सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुन घरगुती पद्धतीने विसर्जन करण्यावर भर द्यावा. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस यंदा परवानगी मिळणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
लाेकप्रतिनिधींनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत रस्त्यावरील गर्दी टाळावी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत बोलत होते. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील काेराेना रुग्णसंख्या कमी करून काेराेना नियंत्रित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात यावे.
महात्मा फुले जनआराेग्य याेजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा यात समावेश केला जात आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाेबतच उपाययाेजनांबराेबरच काेराेनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.