औरंगाबाद - मराठा समाजाच्या विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, यासाठी औरंगाबाद येथील क्रांती चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या व निदर्शने आंदोलन सुरु आहे. गेले दोन दिवसांपासू हे आंदोलन सुरु आहे. यात रविवारी जागरण गोंधळ घालण्यात आला. संभळ, तुणतुणे, डफावर गाणी गाणे व त्यावर मुरळीचा डान्सने या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन केले.
मराठा समाजातील गोरगरीब लोकांना प्रमुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना राबवाव्या, समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणानंतर सकल मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटला. त्यानंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लाखो महिला पुरुष मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते.
(आमचे फेसबुक पेज लाईक करा)
या आंदोलनाची सुरुवात औरंगाबादच्या क्रांती चौकातून सन २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ५८ मुक मोर्चे निघाले. त्यामुळे सरकार हादरले. त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाची अंमलबजावणी अत्यंत धीम्या गतीने होत आहे. शिवाय अनेक मागण्यांची पूर्तता झालेली नाही. (छायाचित्र संग्रहित आहे)
(आम्हाला ट्विटरवर फॉलो करा)