वृत्तसंस्था - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अनेक देशांनी विविध उपाययोजना करुनही कोरोनाची व्याप्ती थांबायला तयार नाही. कोरोनाचे संक्रमण इतके भयानक वाढले आहे की, सोमवारी सायंकाळपर्यंत जगात २ कोटींहून अधिक रुग्ण संख्या झाली आहे. यापैकी ५० लाख रुग्ण तर फक्त गेल्या अवघ्या २० दिवसांत वाढले आहेत. यापैकी भारतातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९.७२ लाख आहे.
जगातील एकूण रुग्णांपैकी भारतात सध्या १९.४४ % रुग्ण आहेत. कोरोनाचा विळखा जगभर वाढत चालला आहे. फक्त गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर जगातील ६३% नवे रुग्ण केवळ भारत (२८.८२%), अमेरिका (२०.६४%) आणि ब्राझीलमध्ये (१७.६४%) आढळले आहेत. म्हणजे जगातील एकूण रुग्णांच्या तुलनेत भारतात एक चतुर्थांश कोरोा पॉझिटिव्ही रुग्ण सध्या आहेत.
(आमचे फेसबुक पेज लाईक करा)
भारत, अमेरिका व ब्राझील हे तीन देश सोडले तर उर्वरित जगात केवळ ३७ % कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या आढळत आहेत. त्यातल्या त्यात आशादायक वृत्त म्हणजे जगात गेल्या १४ दिवसांपासून नव्या रुग्णांची सरासरी वाढली नाही. जागतिक आरोगय संघटनेच्या म्हणण्यानुसार, ब्राझील व अमेरिकेत नवे रुग्णसंख्या स्थिर, तर भारतात मात्र ती सतत वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे.
(आम्हाला ट्विटरवर फॉलो करा)