आठ दिवसांत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार..

कर्नाटकचे प्रशासन नमले, राज्यभरात तीव्र पडसाद

मुंबई - कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कर्नाटक प्रशासनाने हटवल्यामुळे दोन्ही राज्यात संतप्त पडसाद उमटले. गावातील शिवभक्तांनी ठिय्या आंदोलन करुन कर्नाटक प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले. तसेच सीमाकाठच्या शिवभक्तांनीही कर्नाटकात जावुन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे येत्या ७ दिवसांच्या आत महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवला जाईल, असे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

बेळगाव जिल्ह्यातल हुक्केरी तालुक्यात मनगुत्ती नावाचे गाव आहे. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिल्हा प्रशाससनाने रात्रीतून हलवला. रविवारी सकाळी ही बाब शिवभक्तांच्या लक्षात आली. याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळपासून परिसरातील नागरिक गावात जमले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. बेळगावचे एसपी लक्ष्मण निंबर्गी व तहसीलदारांनी बैठक घेतली. त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर प्रशाससनाला नमते घ्यावे लागले. 

आमचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या घटनेनंतर थेट मणगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद दिसून आले. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे अखेर कर्नाटक सरकारला नमते घेत कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा निर्णय जाहीर करावा लागला आहे. 

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !