राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. एक कोटी रुपयांचा निधी जमा केल्यानंतर राम मंदिर न्यासाचे खजिनदार अनिल शर्मा आणि एका व्यक्तीसोबत फोनवर बोलणे झाले. त्यांनी ही रक्कम जमा झाल्याचे सांगितले. तरीही आता देणगी मिळाली नाही, असे म्हणत असतील तर आश्चर्य आहे, असे खासदार अनिल देसाई म्हणाले.
शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपये दिलेले आहेत. ते मिळाले नाही, असे म्हणत असतील तर मग हा निधी कुठे गेला? असा सवाल आता अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ट्रस्टने शिवसेनेला टार्गेट केले आहे. असे असले तरी ते एक कोटी रुपये गेले कुठे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.