युपीच्या कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचे निधन

लखनौ - उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचा मृत्यू झाला आहे. दि. १८ जुलै रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता. तेव्हापासून लखनऊच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कमल राणी घाटमपूर, कानपूर नगर येथील आमदार होत्या. याआधी त्या दोन वेळा खासदार होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे.


कमल राणी या कॅबिनेट दर्जाच्या मंत्री असल्यामुळेे उत्तर प्रदेशवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची १७.५३ लाख प्रकरणे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्या दिवशी ५४ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. तर ५१,३२३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ८५२ जणांचा मृत्यू झालेेला आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !