अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी आणण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. टिकटॉकवर अमेरिकेतील लोकांची खासगी माहिती चीनला पाठवण्याचा आरोप होत आहे. अनेक नेत्यांनी टिकटॉक बंदीचे समर्थन केले आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आम्ही टिकटॉकवर बंदी घालू शकतो. आणखी काही पर्याय आहेत. पुढे काय होते ते पाहूया' असे म्हणून चीनला संकटात टाकले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टिकटॉकमुळे राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनी सध्या टिकटॉकची मूळ कंपनी असलेल्या बायटडांसशी चर्चा करीत आहे. त्याअंतर्गत मायक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करू शकते. सोमवारपर्यंत हा करार निकाली निघण्याची शक्यता आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेनेही चीनी अॅप्सवर कडक धोरण घेतलेले आहे.