वर्षा उसगावकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन - स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरु होत आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळपास एका दशकापूर्वी 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत त्या दिसल्या होत्या. आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्या नंदिनी ही भूमिका साकारणार आहेत. ही मालिका १७ ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे.

या मालिकेद्वारे वर्षा उसगावकर यांचे छोट्य पडद्यावर कमबॅक होत आहे. या मालिकेत त्या मालिकेत कोल्हापूरातील घरंदाज सासूची भूमिका साकारणार आहेत. वर्षा उसगावकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी सिनेमातून ग्लॅमरस भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्रीचा रोलही प्ले केलेला आहे. त्यांच्या एक खास प्रेक्षकवर्गही आहे. आपल्या सौंदर्याने वर्षा उसगावकर यांनी रसिकांना भुरळ घातलेली होती.

वर्षा उसगावकर यांचा हा चाहतावृंद आजही त्यांच्या भूमिकेवर प्रेम करतो. त्यामुळे वर्षा उसगावकर यांचे पुनरागमन दणक्यात होणार, यात शंकाच नाही. अर्थात अनेक वर्षाँनंतर वर्षाजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे त्यांना पुन्हा पाहण्यासाठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !