मुंबई - जर तुमच्या गाडीवर अजूनही जुनी नंबर प्लेट असेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने (RTO) स्पष्ट संकेत दिले आहेत की, १८ फेब्रुवारी २०२६ पासून हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) नसलेल्या वाहनांविरुद्ध कडक मोहीम (Strict Action)राबवली जाणार आहे.
अनेक वेळा मुदतवाढ (Extention) देऊनही वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष (Ingrorance) केल्यामुळे आता थेट दंडात्मक (Fine) कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मात्र आता यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP लावणे अनिवार्य होते. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अद्यापही राज्यातील सुमारे एक कोटीहून अधिक वाहनांनी ही प्लेट (Number Plate) बसवलेली नाही.
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad) परिस्थिती अधिक गंभीर असून, तेथील जवळपास ६५% वाहनांवर अजूनही जुन्याच प्लेट्स (Old Number Plates) आहेत.
केवळ नंबर प्लेटच नाही, इतर कागदपत्रेही (Documents) तपासणार - परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारीनंतर केवळ नंबर प्लेटचीच तपासणी होणार नाही.
एकदा वाहन तपासणीसाठी थांबवले की, अधिकारी खालील गोष्टींचीही पडताळणी करतील :
- नोंदणी प्रमाणपत्र (RC Book)
- विमा (Insurance)
- पीयूसी (PUC)
- चालक परवाना (Driving Licence)
जर यांपैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण आढळले, तर दंडाची रक्कम मोठी असू शकते. ज्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी केली आहे पण अद्याप प्लेट बसवलेली नाही, त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंतची ही १५ दिवसांची 'ग्रेस पिरियड' (Grace Period) देण्यात आली आहे.
महत्त्वाची टीप : फिटमेंट सेंटर्सवर हजारो नंबर प्लेट्स तयार पडून आहेत, परंतु वाहनधारक वेळेवर येत नसल्याचे समोर आले आहे. ऐनवेळी होणारी गर्दी आणि दंड टाळण्यासाठी तातडीने तुमची अपॉइंटमेंट (Appointment) बुक करा.
