निजामाबाद - ज्या आईने जन्म दिला, चालायला शिकवले, आपले दुध पाजून लहानाचे मोठे केले. तिच आई म्हातारी झाल्यावर मुलगा व सुनेने तिला घरी ठेवण्यास नकार दिला. ही घटना अशावेळी घडली, जेव्हा आई कोरोनासारख्या घातक आजारातून बरी होऊन घरी आली. ही घटना तेलंगणाच्या निजामाबादची आहे.
65 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलेने कोरोनावर मात केली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिला जेव्हा घरी परत आली तेव्हा मुलाने तिला घरात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी समजून सांगितल्यावर घरात ठेवण्यास तयार झाले.
मुलगा व सून आपल्या आईला घराबाहेर सोडून घराला कुलूप लावून हैदराबादला फिरायला गेले. वृद्ध महिला तीन दिवस घराबाहेर पडून होती. आजूबाजूच्या लोकांनी महिलेला जेवण दिले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी महिलेच्या मुलाला आणि सूनला बोलावून समुपदेशन केले. मग तो आईला घेऊन जाण्यास तयार झाला.