कोरोना आला तसा सहा महिने घरीच पडून व्हता.. तसंही घराबाहेर कोणी येऊ देत नव्हते ना.. हा आधी कंपनीत नोकरी करायचा.. म्हणून मग आता गावात येऊन रानात काम करायला लाज वाटायची.
घरात सगळ्यात मोठा आहे, आता २८ वर्षाचा झालाय.. म्हणून घरात लग्नाचं चाललंय.. पण आता हाताला काम नाय म्हणून जुळा नाय. रात्री कधी झोपतो माहीत नाय, एक दोन तरी वाजतेत.. मग सकाळ पार १० वाजता उठतो.
पण आज सकाळी लवकरच उठला. मला वाटलं चला, झालं काम चालू एकदाचं. मनाला समाधान वाटलं. पण त्याला मग विचारलं तर म्हणला, "कामाला नाय, मोर्चा काढायचाय ! मंदिर चालू व्हायसाठी'.
शाळा कॉलेज चालू व्हयीन का नाय, ते माहीत नाही, ते ऑनलाईन शिक्षण पोरांना काय कळत नाय, लेकरांच्या भविष्याचं कसं व्हणारे काय माहीत नाय.. पण 'मंदिरं' चालू व्हायला पाहिजे. ते गरजेचं आहे. काय बोलावं आता..
- विकास गोसावी (अहमदनगर)