बंटी जहागिरदारवरील गोळीबार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात, पोलिसांची जलद कारवाई


श्रीरामपूर (अहिल्यानगर) - जिल्हा हादरवून सोडणाऱ्या राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात विविध गुन्ह्यांमध्ये चर्चेत असलेल्या असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (Bunty Jahagirdar) याच्यावर बुधवारी दुपारी झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


रवी निकाळजे (Ravi Nikalje) आणि कृष्णा शिंगारे (Krushna Shingare) अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे केलेल्या तपासातून रात्री उशिरा नाकाबंदी दरम्यान दोघांना जेरबंद करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी कब्रस्तानातून परत येत असताना जर्मन हॉस्पिटल समोरील मुख्य गेटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे नगर येथील खाजगी रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. हल्ला अल्पवयीन मुलांकडून झाल्याचीही प्राथमिक चर्चा होती, मात्र पोलिस तपासानंतर दोन प्रमुख आरोपींची नावे स्पष्ट झाली आहेत.

बंटी जहागीरदार अनेक गुन्ह्यांत सहभागी होता. पुण्यातील जंगली महाराज रोड स्फोट (Blast) प्रकरणासह श्रीरामपूरमध्येही विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर कारवाई झाली होती.

देशविघातक कारवायांच्या संशयावरून त्याला नाशिक एटीकडूनही दोन वेळा अटक झाली होती. राजकारणात सक्रीय असलेल्या या नावाजलेल्या व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यामागील नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

तरी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे आरोपी पकडले गेल्याने शहरातील वातावरणात तात्पुरता दिलासा निर्माण झाला आहे. आता जहागीरदार याच्यावरील हल्ला नेमका का झाला, याचा पोलीस शोध घेत आहेत.

हे देखील वाचा : पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागिरदार गोळीबारात ठार 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !