बंटी जहागीरदार हत्याकांडाच्या तपासाला वेग; लोकेशन सांगणारे पोलिसांच्या ताब्यात

 येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

श्रीरामपूर (अहिल्यानगर) - दि. ३१ डिसेंबर रोजी पुणे बॉम्बस्फोट (Pune Blast Case) प्रकरणातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार (Bunty Jahagirdar) याची श्रीरामपूर येथे गोळीबार (Firing) करून हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक हत्याकांडाचा तपास अधिक गतीने पुढे जात असताना, जहागीरदार हत्येच्या दिवशी नेमके कुठे आहेत याची माहिती मोबाईलवरून मुख्य आरोपींना देणारे दोघे संशयित (Suspected) पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास अंत्यविधीवरून परत येत असताना बंटी जहागीरदार यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू (Shot Dead) झाला. या घटनेमुळे श्रीरामपूरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

त्यानंतर सुरू असलेल्या सखोल तपासात पोलिसांना जहागीरदार यांच्या हालचालींबाबत गोळीबार करणाऱ्या आरोपींना रिअल टाईम (Real Time Location) माहिती देणारे दोघे संशयित असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे संतोष रोकडे (वय २२) व मयूर वावधने (वय २५, दोघेही रा. सिद्धार्थ नगर, श्रीरामपूर) यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. दोघांना श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) जयदत्त भवर यांनी सांगितले की, अटक (Arrested) करण्यात आलेले दोघे केवळ पहारेकरी म्हणून काम करत नव्हते, तर बंटी जहागीरदार नेमके कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती मोबाईलद्वारे थेट गोळीबार करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचवत होते, असा पोलिसांना ठोस संशय आहे. या अनुषंगाने त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, दोघा संशयितांची झाडाझडती घेतली असता त्यांनी वापरलेले वैयक्तिक मोबाईल फोन, तीन सिमकार्ड (Sim Card) आणि एक अतिरिक्त मोबाईल फोन (Mobile) पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलची कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर CDR) तपासल्यानंतर हत्याकांडात या दोघांची नेमकी भूमिका, तसेच आणखी कुणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपीचा दिवसाढवळ्या खून आणि त्यामागील कट उघडकीस येण्याची शक्यता लक्षात घेता, हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा : पुणे बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी बंटी जहागिरदार गोळीबारात ठार

ही बातमी वाचा : बंटी जहागिरदारवरील गोळीबार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !