बॉम्बस्फोटातील आरोपी व माजी नगरसेवक बंटी जहागिरदार गोळीबारात ठार


श्रीरामपूर (अहिल्यानगर) - पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी व माजी नगरसेवक असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार (Bunty Jahagirdar) हा बुधवारी दुपारी श्रीरामपूर (Shrirampur) शहरात गोळीबारात (Firing) ठार झाला आहे. कब्रस्तानातून परत येत असताना जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.


गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अल्पवयीन मुलांनी हा गोळीबार केल्याची श्रीरामपुरात चर्चा आहे. मात्र पोलिसांनी या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जखमी अवस्थेत जहागिरदारला उपचारांसाठी साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे तेथून त्याला नगरच्या खाजगी दवाखान्यात (Private Hospital) नेण्यात आले. सायंकाळी उशिरा तो मृत (Shot Dead) झाल्याचे तेथील वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे शवविच्छेदन (Post Martem) करण्यासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, सोशल मिडियावर (Social Media) जहागिरदार ठार झाल्याची वार्ता व्हायरल झाली.

त्यामुळे जहागिरदारला पाहण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठा जमाव गोळा झाला. त्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. वैद्यकीय पंचनामा केल्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास त्याला रुग्णवाहिकेतून (Ambulance) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) हलवण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील जमाव पांगला.

ऑगस्ट २०१२ मध्ये पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर (Jungali Maharaj Road) झालेल्या स्फोटाच्या (Blast) गुन्ह्यात बंटी जहागिरदार याला अटक करण्यात आली होती. याशिवाय श्रीरामपूरमध्ये इतरही गुन्हे दाखल असल्याने त्याला अनेकदा तडीपार करण्यात आले होते. पोलिस दफ्तरी त्याच्याविरुद्ध १५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशविघातक कारवायांच्या संशयावरून नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला दोन वेळा अटक केलेली आहे. त्याच्याकडे अवैध शस्त्रे (Illegal Weapons) देखील आढळून आली होती. तो यापूर्वी राजकारणातही सक्रीय होता. श्रीरामपूर नगरपरिषदेचा तो माजी नगरसेवक (Corporater) होता. त्याची आईदेखील नगरसेविका होती. त्याच्यावर हल्ला (Attack) मात्र नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !