अहिल्यानगर - आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची (Shivsena UBT) उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या रणनीतीनुसार सक्षम, सामाजिक भान असलेले व जनतेशी थेट संवादात राहणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे.
आता इतर पक्षांकडून होणाऱ्या घोषणांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या उमेदवारांवर विभागातील समस्या, विकासकामे, मूलभूत सुविधा, पाणीप्रश्न, रस्ते व स्वच्छता या मुद्द्यांवर काम करण्याची जबाबदारी असेल.
शिवसेना (उ.बा.ठा.) - उमेदवार यादी
- प्रभाग ३ - योगीराज गाडे
- डॉ. नीलम विपुल वाखुरे, केतन क्षीरसागर, अनिता प्रशांत दारकुंडे
- प्रभाग ५ - सुनील भोसले
- प्रभाग ६ - गणेश आपरे
- प्रभाग ७ - महेश शेळके
- प्रभाग १० - गौरव ढोणे, संपदा म्हस्के, शितल भिंगारदिवे, दिलदार सिंग बीर
- प्रभाग ११ - विशाल वालकर, ताराबाई शिंदे, कल्पेश परदेशी
- प्रभाग १२ - रूपाली गोटीपामुल, आशाबी युनूस सय्यद
- प्रभाग १५ – विलास उबाळे
- प्रभाग १६ - प्रतीक बारसे, डॉ. श्रीकांत चेमटे, सुनिता संजय कोतकर, अश्विनी पाचारणे
- प्रभाग १७ - प्रशांत भाले, सिद्धांत कांबळे

