भारीच ! पहिल्या सुपरमूनचे खगोलमय दर्शन, खगोल मंडळाचा स्तुत्य उपक्रम


शेवगाव (अहिल्यानगर) - बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव येथील खगोल मंडळातर्फे दिनांक 3 जानेवारी रोजी या वर्षातील पहिल्या सुपरमूनचे (Super Moon) विलोभनीय दर्शन विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे (Telescope) घडवण्यात आले.

यावर्षी दिसणाऱ्या तीन सुपरमूनपैकी हा पहिला सुपरमून असून, डिसेंबर महिन्यात दिसणारा सुपरमून हा सर्वांत मोठा असणार असल्याची माहिती खगोल मंडळाचे मार्गदर्शक अभिषेक जोशी यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सुपरमून म्हणजे काय? तो कधी व कसा दिसतो? त्यामागील खगोलशास्त्रीय कारणे व पृथ्वीवर (Earth) होणारे संभाव्य परिणाम यांची सविस्तर माहिती देण्यात आली. टेलिस्कोपमधून दिसणाऱ्या तांबूस रंगछटेतल्या चंद्राचे (Moon) दर्शन घेताना विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.

बाळासाहेब भारदे हायस्कूल (Balasaheb Bharde Hishschool) खगोल मंडळातर्फे (Space Study Center) वर्षभर विविध वैज्ञानिक उपक्रम राबवले जात असून, त्यामध्ये आकाशदर्शन, खगोलीय घटनांमागील विज्ञान (Science), क्षेत्रभेटी (Visit) यांचा समावेश आहे. यावर्षी घडणाऱ्या इतर महत्त्वाच्या खगोलीय घटनांचे प्रत्यक्ष दर्शनही विद्यार्थ्यांना घडवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे योगदान विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे, अंधश्रद्धा (Superstition) दूर व्हाव्यात व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम (Project) सुरू करण्यात आल्याचे प्राचार्य संजय कुलकर्णी व हरीश भारदे यांनी सांगितले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा (Curiocity) निर्माण करणारा व खगोलशास्त्राची गोडी लावणारा ठरल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !