'हिंजवडी आयटीपार्क'मध्ये असे चालायचे सेक्स रॅकेट

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई 

पिंपरी चिंचवड: येथील आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारने केला आहे. चार महिलांची सुटका करत चार व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी गणेश कैलास पवार (वय 20, रा. हॉटेल ग्रॅन्ड मन्नत, येळवंडे वस्ती, हिंजवडी, पुणे. मूळ रा. सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांना माहिती मिळाली की, हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर काही तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेतला जात आहे. पोलिसांनी सुरुवातीला तिथे बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवले आणि माहितीची खात्री केली.

त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या चार तरुणींची सुटका केली. या तरुणींना रेस्क्यु फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. हॉटेलचा मॅनेजर आरोपी गणेश पवार आणि त्याच्या अन्य साथीदार मागील 7 ते 8 दिवसांपासून पीडित तरुणींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते.

आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉटसअ‍ॅप नंबर प्रसारित केले होते. त्या क्रमांकावर संपर्क केल्यावर ते पिडीत तरुणींचे फोटो पाठवायचे व त्याठिकाणी सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत होते. पोलिसांनी हे रॅकेट उध्वस्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, खंडाळे यांच्या पथकाने केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !