डॉ. निलेश शेळकेला पोलिस कोठडी. पण 'या' प्रकरणात..

अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध घेताना पोलिसांना शुक्रवारी दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपी डॉ. नीलेश विश्वास शेळके सापडला होता. त्याला अटक केली असून पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी शेळके याला पोलिसांनी जरे प्रकरणात चौकशीकरिता ताब्यात घेतले. सुपा पोलिस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी केली. डॉ. शेळके याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या फसवणूक प्रकरणी शेळके याला अटक केली.

दरम्यान, शनिवारी सकाळी शेळके याला न्यायालयामध्ये हजर केले अस न्यायालयाने त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

कोणत्या गुन्ह्यात शेळकेला अटक ?

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली होती. ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. शेळके याने हॉस्पिटलला मशिनरी खरेदी करण्यासाठी बँकेकडून माझ्या नावाने कर्ज घेतले. पण मशिनरी खरेदी न करता माझ्या अकाउंट वरून त्यांनी परस्पर पैसे काढून अपहार केला व फसवणूक केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. 

अटकपूर्व जामीन मिळाला होता ?

नंतर हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केलेला होता. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी आहेत. यात शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचाही समावेश आहे. दरम्यान, आरोपी डॉ. नीलेश शेळके याने अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

उच्च न्यायालयात मात्र शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. शेळके हा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथेही त्याचा अर्ज फेटाळला गेला होता. तेव्हापासून शेळके हा फरार होता. त्याला अटक करुन शनिवारी कोर्टापुढे हजर करण्यात आले व पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. 

यासाठी मिळाली पोलिस कोठडी

शेळके मुख्य आरोपी असून त्याने पैसे कशा पद्धतीने काढले, ते कुठे वापरले, याचा तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ३० डिसेंबर पर्यंत शेळके याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !