नवी दिल्ली - एक महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अखेर 20 मिनिटे वेळ दिला. आम्ही मोकळ्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. निमित्त होते देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपयाचा निधी ट्रान्सफर करण्याचे. मात्र पंतप्रधानांच्या मनात बंगाल आणि शेतकऱ्यांचे आंदोलन होतं. ते जवळपास 80 मिनिटे बोलले. यापैकी 20 मिनिटे त्यांनी शेतकरी आंदोलनातील मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले - सरकार प्रत्येक पावलावर शेतकऱ्यांसोबत उभे आहे. नवीन कायद्यानंतर शेतकरी हवे तिथे आणि जिथे योग्य किंमत मिळेल तिथे आपले पीक विकू शकते. काही लोक भ्रम पसरवत आहेत की, कायद्याने तुमची जमीन जाईल, पण त्यांच्या गोष्टींमध्ये येऊ नका.
तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, या आंदोलनामध्ये अनेक साधे-भोळे शेतकरी आहेत. मात्र कृषी कायद्यांविषयी खोटे पसरवले जात आहे. काही लोक भ्रम पसरवत आहेत की, नवीन कृषी काद्यांनी त्यांची जमीन जाईल. ही बाब चुकीची आहे.
ही नेतेही शेतकऱ्यांच्या नावार आपला अजेंडा चालवत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.हे लोक हिंसक आरोपींना तुरुंगातून सोडवण्याची मागणी करत आहेत. आम्ही विश्वास देतो की, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. समाधान व्हावे यासाठी आम्ही मोकळेपणाने चर्चा करु.
अनेक ठिकाणी स्थानिक निवडणूका झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांना वोट द्यायचे होते. लोकांनी चळवळीतील नेत्यांच्या विरोधात मतदान केले. आज मी विरोधकांना नम्रपणे सांगतो की आमचे सरकार बोलण्यास तयार आहे, परंतु चर्चा, तर्कशास्त्र आणि तथ्यावर होईल.