मुंबई : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे भुषवणाऱ्या अजिंक्य रहाणेने आता विराट पुन्हा कर्णधारपदी येणार असतानाच यक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्त्व करत अतिशय महत्त्वाच्या अशा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर भारताचे नाव अजिंक्य रहाणेने कोरले आहे. ही कामगिरी करून त्याने क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचीही मने जिंकली आहेत. पण, आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाची धुरा सुट्टीहून परतणाऱ्या विराट कोहलीच्याच हाती असणार आहे. त्यावर अजिंक्यची काय प्रतिक्रिया असेल, याकडेच सर्वांचे लक्ष होते.
या बाबत पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्य म्हणाला, निर्विवादपणे विराटच संघाचा कर्णधार असून आपण जेव्हा गरज असेल तेव्हा संघाचे नेतृत्त्वं करण्यासाठी आहोतच..
अशी लक्षवेधी प्रतिक्रिया देऊन अजिंक्यने पुन्हा सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्यावर पुन्हा एकदा संघाच्या उपकर्णधारपदाची जबबादारी असेल.