टोकियो (वृत्त संस्था) : आपल्या पक्षातील काही खासदार नाईट क्लबमध्ये गेल्याबद्दल जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी बुधवारी देशाची माफी मागितली. कोरोनाच्या पार्शवभूमीवर बाहेर पडू नका असे सरकारने केलेले आवाहन झुगारून हे महाशय बाहेर गेले होते.
करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये अपयशी होत असल्याचा ठपका लावत पंतप्रधान सुगा यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी तो रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि निर्णय अपुरे असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच खासदारांनीच नियमांचे उल्लंघन करुन नाईट क्लबमध्ये हजेरी लावल्याने जपान सरकारवर टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. “लोकांनी रात्री आठनंतर घारबाहेर पडू नये, बाहेरच्या गोष्टी खाणं टाळावं आणि गरज नसेल तर उगाच बाहेर फिरु नये असं आम्ही लोकांना सांगत असतानाच आमच्या खासदारांनीच या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मी खूप निराश आणि दु:खी झालो आहे. जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढेल अशापद्धतीचे आचरण प्रत्येक खासदाराचे असावे.