तुमचं काम अडवणाऱ्या अधिकाऱ्याला असा विचारा जाब

भाग १ 

नाशिक : माहितीचा अधिकार हा आपल्याला मिळालेली एक महत्वपूर्ण देणगी आहे. याचा वापर करून आपण अधिकारांचा चुकीचा वापर करून अन्याय करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करू शकतो. मात्र त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसल्यास हे हत्यार आपण वापरू शकत नाही. त्यासाठीच हा माहीतच अधिकार कसा वापरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याइर्यंत पोचवणार आहोत.

आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कोणत्याही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदान प्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता. यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो. अर्ज इंग्रजी हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.

तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा 

१. सहायक लोक माहिती अधिकारी किंवा लोक माहिती अधिकारी (पी आय ओ ) यांचे नाव व पत्ता

२. विषय : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 सेक्शन 6 (1) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज 

३. तुम्हाला ज्या संस्थेकडून किंवा प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्ट माहिती 

४.  अर्जदाराचे नाव 

५. वडिलांचे किंवा पतीचे नाव 

६. वर्ग : अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्गीय इ.

७. अर्ज फी 

८.  तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो किंवा नाही 

९. पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी आवश्यक नाही) 

१०. तारीख आणि स्थळ स्थळ 

११. अर्जदाराची सही 

१२. सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोक माहिती अधिकारी / लोक माहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. 

मात्र अनुसूचित जाती किंवा जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीकडून फी आकारण्यात येत नाही. ज्यांना ही माहिती हवी असेल यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती / जमाती /दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज स्वतः जाऊन किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा. खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा. तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा, सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा इ.) दोन छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा.

जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही-शिक्का घ्या. जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल, तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा. लोकमाहिती अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून च्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरवण्याची मुदत मोजतात.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !