नवीदिल्ली : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकरी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत.
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचे जवळपास गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले. काही शेतकरी आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले.
राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर परेडला सुरुवात केली. यानंतर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने दिल्ली सीमेवर तणाव निर्माण झाला.