कोरोना संकट ! तब्ब्ल एव्हढ्या जणांच्या नोकऱ्या गेल्या

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. 22 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या गेल्या आणि कामगारांचे 37 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालात नोंदवण्यात आलाय.

2009च्या मंदीच्या तुलनेत कोरोना काळात बेरोजगारीचा आलेख हा चार पटीने वाढला आहे. ही माहिती सोमवारी जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालात देण्यात आली.  एकूण 22 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या आणि कामगारांना 37 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) असा अंदाज वर्तवला आहे की, कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी कंपन्या आणि सार्वजनिक जीवनावर घातलेल्या निर्बंधांमुळे जगातील कामकाजाच्या 8..8 टक्के तोटा झाला. दररोजच्या मजुरीनुसार जर हे पाहिले तर एकूण 22.5 कोटी नोकरीचे नुकसान होऊ शकते. 2009 च्या जागतिक बँकिंग सर्किटमध्ये या नोकऱ्यांच्या चार पट वाढ झालीय.

आयएलओचे महासंचालक गाय रायडर म्हणाले की, “हा कोरोना विषाणू: 1930 च्या दशकातील महामंदीनंतरचे सर्वात मोठे संकट आहे. या वेळेच्या संकटात कामाचे तास आणि अभूतपूर्व बेरोजगारी ही दोन्हीमध्ये घट झाली. कोरोना विषाणूच्या संकटामध्ये रेस्टॉरंट्स, बार, दुकाने, हॉटेल आणि इतर सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराचे नुकसान झाले.

रोजगारांच्या संधीं वाढणार

रोजगाराच्या संधी आणि नोकरी गमावल्यामुळे जगातील रोजगार आणि कामगारांचे 3700 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. आयएलओ महासंचालकांनी त्याचे वर्णन ‘अपवादात्मक मोठे’ नुकसान म्हणून केले आहे. यात महिला आणि तरुणांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. यंदाच्या उत्तरार्धात पुन्हा रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, परंतु हे कोरोना संक्रमण भविष्यातील स्थितीवर अवलंबून असेल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !