'त्या' स्मशानभूमीची मरणयातनेतून अखेर सुटका

डॉ. अमोल फडके यांच्या प्रयत्नांना यश

शेवगाव : शहरातील आखेगाव रोडवरील स्मशानभूमीच्या मरणयातना अखेर संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. स्मशानभूमीची नगरपरिषदेने साफसफाई केल्याने येथील झालेली दुरवस्था दूर झाली आहे.  तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी याबाबतची मागणी नगरपरिषदेकडे केली होती.

एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी 19 डिसेंबर रोजी  डॉ. अमोल फडके  आखेगाव रोड, खंडोबा नगर येथील स्मशानभूमी मध्ये गेले असता तेथील दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आली होती.

स्मशानभूमी मध्ये आलेल्या लोकांना साधी उभा राहण्यायोग्य जागा सुद्धा स्मशानभूमी मध्ये शिल्लक नव्हती. सगळीकडे सुकलेले गवत, काटेरी वनस्पतींचे साम्राज्य पसरलेले होते.

स्मशानभूमीची अशी दुरवस्था झाली होती.

तेथील दुरवस्था डॉ. फडके यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या बाबत लक्ष घालून त्वरित या स्मशानभूमीची नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून साफसफाई करावी, अशी मागणीही केली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यानी तेथील सर्व सुकलेले गवत, काटेरी झुडपे काढून घेऊन स्मशानभूमीची साफसफाई केली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !