शेवगाव : मौजे गायकवाड जळगाव (ता. शेवगांव, जि. अहमदनगर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रिती सोनवणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.
शेवगांव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात लढलेल्या ग्राम पंचायत निवडणूकी वंचित आघाडीला हे यश प्राप्त झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड जळगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष रवींद्र बोरुडे, सिध्दार्थ सोनवणे, सिताराम गालफडे, आर्यन काशिद, ओंकार गायकवाड, दिलीप घोगसे, विकास सोनवणे, राजू पठाण, विलास वाघमारे, दिलीप झिजुंर्डै, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांनीही मोलाचे कार्य केले.
निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले, यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच प्रा किसन चव्हाण, सागर गरूड़, शेख सलीम जिलाणी, लखन घोडेराव, राजूभाई शेख, सागर हवाले, विशाल ईगंळे, सुरेश खंडागळे यांनी निवडुण आलेल्या सर्व सदस्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.