शेवगाव - शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत वंचितचे सदस्य निवडून आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव प्रा. किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनखाली शेवगाव तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीवर खुल्या जागेवर सरपंचपदी चंद्रकला महादेव सातपुते यांची निवड झाली, तर उपसरपंच पदी सुनिता गोटिराम तूपविहिरे विराजमान झाल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, शेवगांव तालुका अध्यक्ष विशाल ईगंळे, सलीम जिलाणी शेख, सागर हवाले, शेख राजू भाई, अन्सारभाई कुरैशी, सह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचे वंचीत आघाडी च्या वतीने अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्वसामान्यांचा विकास साधा : प्रा. चव्हाण प्रा. चव्हाण म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांची विकासाची गुरुकिल्ली आहे. त्याचा योग्य तो वापर करून सर्वसामान्य नागरिकांचा विकास साधावा. वंचित घटकापर्यंत शासनाची योजना पोहचून वंचित घटकाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना शुभेच्छा दिल्या.