ताजनापुर ग्रामपंचायत ताब्यात
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील ताजनापुर ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली असून सरपंचपदी वैशाली गायकवाड तर उपसरपंचपदी नारायण बलीया यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वय ज्ञानदेव वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली व शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्यात आल्या.
या निवडीबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे शेवगाव काँग्रेस कमिटी तर्फे अभिनंदन करण्यात आले.