शेवगाव - शेवगावचे भुमिपुत्र माजी सैनिक संजय डोंगरे यांची एम आय टी कॉलेज पुणेच्या डिफेन्स विंग सल्लागारपदी नियुक्ती झाली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
माजी सैनिक संजय डोंगरे यांनी यश फाऊंडेशनच्या मदतीने शेवगावचे तरुणांनी आपल्या जिवनात प्रगती करुन अभ्यास करुन शासकीय सेवेत अधिकारी व्हावे या ऊद्देशाने गरडवाडी येथे अभ्यासिका चालू केली. त्याचप्रमाणे पुढे ईतर गावातही अभ्यासिका ऊभारणीचा त्यांचा माणस आहे.
खेड्यातील तरुणांना अभ्यासासाठी मार्गदर्शन आणि साधन ऊपलब्ध करुन देणे, हा यामागील मुख्य हेतूू. फक्त तरुणांनी संधीचे सोणं करावे हाच खरा माणवता धर्म आहे. आपल्या तारुण्यातील २४ वर्षे देशसेवेसाठी दिले. त्यात अनेक बरेवाईट प्रसंग आले. आपण ज्या हाल, यातना सहन केल्या.
त्या आपल्या भागातील तरुणांच्या वाट्याला येऊ नये हे ध्येय समोर ठेवून माजी सैनिक डोंगरे यांनी वाटचाल चालू केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील नामांकित व देशात नाव असलेले काँलेज म्हणजे एम. आय . टी. पुणे यांच्या डिफेन्स विंग च्या सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली.
ज्या समितीवर भारतीय सेनेचे सेवानिवृत्त कर्नल, भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त विंग कमांडर कार्यरत आहेत. या निवडीबद्दल माजी सैनिक संघटना शेवगाव व पाथर्डीने त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.