मुंबई : स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतियपंथी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे. यावेेळी तृतियपंथीयांसह सर्व उपस्थितांनी आजीवन व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली.
नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून १५ आँगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान संपुर्ण भारतात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात येत आहे. या अंतर्गत तृतियपंथीयांनी स्वतः निर्व्यसनी राहुन या बाबत समुपदेशन, उपचार, प्रचार करावा या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवतकर बोलत होते.
निवतकर यांनी तृतियपंथीयांच्या विविध समस्या आणि व्यसनांसमवेत जोडला जाणारा संबंध यापासुन कसे परावृत्त होता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तृतियपंथीयांसाठी शासकीय विविध योजना आणि त्यासाठी सहभाग व लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
यावेळी उपस्थितांनी आजीवन व्यसनमुक्तीची शपथ ग्रहण केली.
गोकुळदास रुग्णालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डाँ. सारिका दक्षिकर यांनी उपस्थित तृतियपंथीयांचे जिवनपध्दती आणि त्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी व्यसनांना आपसुकच जवळ केले जाते . या व्यसनांचा आधार घेऊनच जिवन व्यतीत करण्याची मानसिकता विषद केली.तसेच या गोष्टींपासुन परावृत्त होण्यासाठी मुंबईतील शासकीय रुग्णालये, व्यसनमुक्ती उपचार केंद्रे, समुपदेशन, उपचार पध्दतीची माहिती दिली.
तृतियपंथीयांची मुंबईतील लोकसंख्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या सोई, सुविधा यांची माहिती घेऊन नियोजन करण्यासाठी सर्व्हे फाँर्म भरुन सहकार्य करुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग मुंबई शहर समाधान इंगळे यांनी केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल मडामे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेसमवेत जोडुन राहुन आपल्या संपर्कात येणाऱ्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व तृतियपंथीयांनी हम होंगे कामयाब सामुहिक गीत म्हणत आम्ही व्यसनमुक्तीचा निर्धार केल्याचा जल्लोश केला.