खळबळजनक ! घनकचरा प्रकल्प प्रमुख नाशिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात ?

अहमदनगर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्याधिकारी डॉ. नरसिंह सर्वोत्तम पैठणकर यास अडीज लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले. सावेेडीतील कचरा डेपोच्या कार्ययलयत ही कारवाई केली.

नेमक्या कुठल्या कारणाने लाच घेतली याचे कारण अद्याप समजले नाही. तसेच कोणाकडून लाच स्वीकारत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  या कारवाई बाबतची अंतिम सविस्तर माहिती लवकरच कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग देणार आहे. 

तत्कालीन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना निलंबीतही केले होते. घनकचरा प्रकल्पाबाबत त्यांच्या विरुद्ध अनेक आरोप झाले होते. प्लास्टिक बंदीवरही त्यांनी काम न केल्याचा ठपका त्यांच्यावर होता. 

दरम्यान, एव्हढ्या मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मोठ्या पदावरील अधिकारी जाळ्यात सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !