'त्या' नामांकित डॉक्तरची पत्नी, दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर  - कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ.महेंद्र थोरात त्यांनी पत्नी, दोन मुले यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र  एकच खळबळ माजली आहे.


शनिवारी सकाळी डॉक्टरांना अनेक फोन करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोक त्यांच्या घरी पोहचले. दार वाजवले मात्र तरीही दार न उघडल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दार तोडून घरात प्रवेश केला असता अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले.  

डॉ. महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७), त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१) यांच्यासह दोन मुले कृष्णा (वय १६) व कैवल्य (वय ६) हे तिघेही मृतअवस्थेतआढळून आले. याबाबतची माहिती मिळताच डीवायएसपी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार सोमनाथ दिवटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

ही घटना कळताच अनेकांनी डॉ.थोरात यांच्या श्रीराम हॉस्पिटलकडे धाव घेतली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, वैद्यकीय क्षेत्रामुळे सर्वांच्या संपर्कात असलेल्या डॉ.थोरात यांनी असे का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !