नाशिक, नागपूर 'मेट्रो'ला अर्थसंकल्पात हिरवा कंदील

नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : नाशिक आणि नागपूर या महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधल्या मेट्रोला यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

भारतीय रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारत सरकार 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार आहे. तर 2023 पर्यंत ब्रॉडग्रेजचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

अभिनंदन नाशिक, नागपूर !

नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केलेल्या या घोषणेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी म्हटले की, आम्हाला आनंद आहे की भारत सरकारने आमच्या अभिनव दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे आणि नाशिक मेट्रोच्या मॉडेलला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारले आहे. इतकेच नव्हे तर इतर मेट्रो शहरांमध्येही नाशिक मेट्रो मॉडेल राबविण्यात येणार आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !