शेवगाव नगरपरिषद : 'या' थकबाकीला जबाबदार कोण ?

शेवगाव :  शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिलेल्या इशार्याप्रमाणे शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काही थकीत करधारकांच्या मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई रविवारी करण्यात आली. मुळात हि थकबाकी  राहिलीच कशी, याला जबाबदार कोण, याचा शोध केकाण साहेबांनी घेण्याची गरज आहे. 

केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली  शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीतील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार सहा रूपये, हॉटेल गारवाकडे ५९ हजार ४११ रूपये तसेच आनंद कॉटेक्सकडे (जिनिंग मिल ) रक्कम ३ लाख ८८ हजार ७८९ रूपये मालमत्ता कर थकबाकी होती. नगर परिषदेच्या पथकाने प्रशासक तथा प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल संकेत, हॉटेल गारवा व आनंद कॉटेक्स (जिनिंग मिल) या तीनही मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई केली.

शेवगाव नगरपरिषद पदाधिकारी यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी केकाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रशासक केकाण यांनी नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर थकित मालमत्ता कर धारकांवर कारवाईचे संकेत दिले होते. थकीत मालमत्ता धारकांची कर वसुली मोहिम सुरू करून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकेल. तसेच शहराच्या विकासकामांना चालना मिळेल या उद्देशाने प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.


ही थकबाकी राहिलीच कशी ?

मुळात हि थकबाकी राहिलीच कशी याचा शोध घेण्याची गरज आहे. पाच वर्षांपासून शेवगावला नगरपरिषद आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेच या गोष्टीचा लेखाजोखा असेलच. त्यांनी या थकबाकीधारकांवर कारवाई का केली नाही, एव्हढा साधा प्रश्न आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? या  प्रश्नांच्या उत्तरातच या थकबाकीधारकांना कोणी आणि का पाठीशी घातले याचे उत्तर मिळेल. फक्त ते प्रामाणिकपणे शोधण्याची गरज आहे. हि जबाबदारी केकाण साहेब यथोचित पार पाडतील असा विश्वास शेवगावकरांना आहे.


उद्या (ता. १६ फेब्रुवारी ) सकाळी वाचा : केकाण साहेब ! मुख्याधिकाऱयांच्या कार्यकाळात दडलंय काय?  नगरपरिषदेच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कामकाजावर शेवगावकर बिलकुल समाधानी नाहीत हे त्यांच्या संतातून दसून येतेय. अनेक प्रभागात न झालेल्या विकास कामांमुळे आणि अनेकवेळा नगरपरिषद व मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतींवर झालेल्या आरोपांमुळे शेवगावकर अक्षरशः वैतागले आहेत. या संपूर्ण कार्यकाळात नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांनी पार पाडलेल्या जबाबदारीची शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी तपासणी बारकाईने करावी अशी अपेक्षा शेवगावकरांना आहे. या बाबत केकाण साहेब यांना मार्गदर्शक ठरतील असे काही मुद्दे शेवगावकरांनी उपस्थित केले आहेत. याद्वारे नगरपरिषदेच्या कामाचा शेवगावकरांना संभ्रमित करणारा लेखाजोखा मांडण्याचे काम 'एमबीपी लाईव्ह २४' ने केले आहे. उद्या जरूर वाचा. तसेच आपल्याला काही मांडायचे असल्यास आपण ते आमच्याकडे जरूर मांडावे. 


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !