अहमदनगर - राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (दि. २९ मार्च) नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने पालकमंत्री येत आहेत.
सोमवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर येथून खाजगी विमानाने ते शिर्डीला येणार आहेत. सकाळी १०:३० वाजता शिर्डी विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. शिर्डी येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगरकडे येतील.
दुपारी १२ वाजता कोरोना लसीकरण, सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे होणार आहे. तसेच प्रशासकीय माहिती जाणून घेणार आहेत.
दुपारी १:३० वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयातच होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता ते शासकीय विश्रामगृहावर जातील. तेथे काही पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सायंकाळी पुन्हा शिर्डीला रवाना होणार आहेत. पण तत्पूर्वी..
दुपारी १२:४५ वाजता जिल्हयातील यापूर्वी व सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांना मिळणा-या शासकीय मदतीबाबात (उदा. आर्थिक मदत, बियाणी, खतपुरवठा, पीक कर्ज पुरवठा इ.) बाबत आढावा बैठक घेतील.