सुंदर समंजस क्षणाची घालमेल

आयुष्यातल्या सुंदर समंजस क्षणांना समोर जायचंय,अगदीच त्यांनाही न समजताच त्यात एकरूप व्हायचं.. पण कधी कुठं आणि कसं ह्या प्रश्नांची उत्तरं मात्र एकरूप झाल्यानंतरही घट्ट वीण घालून अलगद मनात नाचत होती....

समंजसपणे कि आपल्या समंजसपणाचा असमंजसपणे बोध न होऊ देता... मनाच्या कोपऱ्यात मुस्कटदाबी झाल्यासारखी थेमान माजवत होती... अगदीच मनातल्या सुदंर मनाला स्वतःपुरत सुदंर बनवण्यासाठी..
   
असा हा आकांत तांडव आयुष्य फक्त स्वतःपुरत सुंदर करण्यासाठी केलात.. तर होईल का जीवन नखशिखांत सुंदर.. पण मग सुंदर आयुष्याची अनुभूती कशी पदरात पडणार ? स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या म्हणा. या अशा वेळी आयुष्यातील 'सुंदर समंजस' ही कल्पना मग मार्मिक वाटू लागते..

आपण तेव्हा काय आदर्श ठेवणार पुढच्या पिढीला सुंदर समजस क्षणाचा.. फक्त हि कल्पना मनात घर करून बसेल नाही का? वाटतंय तुम्हाला पण असं जगावसं.. वाटतंय का आयुष्यातले सुदंर निरागस क्षण अगदीच एकांतात. स्वतः सोबत फक्त आनंदाला सोबत घेऊन... 

आयुष्यात फक्त या आनंदाला सोबत घेऊन जगलं तर.. कालचक्रा प्रमाणे येणाऱ्या दुःखाचा आपल्याला विसर पडला. परंतु समजस्या प्रमाणे प्रत्येक क्षणाला समोर जायचं. येणारं दुःख म्हणजे आयुष्यातल्या सुंदर सुखाची सुरवात.. 

त्याची आठवण करून देणारं किंवा त्याची किंमत काय होती, हे अगदीच माफक क्रियेतून आपल्याला सांगण्यासाठी ठोठावलेलं दुःख म्हणून आपल्या दारात उभं राहिलेलं.. हे अनावधित कालचं दुःख त्या क्षणिक सुखाच्या आठवणींच्या हिंदोळयाची जाणीव करून देण्यास पुरेसं ठरतं.

खरंच जीवन जगताना आपल्या आयुष्यात येणाऱ्या या सुख दुःखाच्या रुपात आपल्या भोवती फेर धरणारी हि दोन कल्पकतेच्या जवळ मार्मिकतेप्रमाणे आयुष्याच्या वाटेवर समंजस क्षणाची पाऊल वाट कशी चालायची, हे शिकवणारी दोन वलय ठरली आहेत.

- आरती
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !