अहमदनगर - जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने पुन्हा तांडव केले. मंगळवारी जिल्हयाच्या रूग्णसंख्येत २ हजार ६५४ ने वाढ झाली. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल १४ हजार २६४ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८२ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ४२१ रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर दिवसभरात १ हजार ३५२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मंगळवारी मनपा २१८, अकोले ७२, जामखेड १९, कर्जत ४४, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३०, नेवासा ७, पारनेर ४५, पाथर्डी ३६, राहता ३०, राहुरी ११, संगमनेर ९८, शेवगाव २८, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड ३०, मिलिटरी हॉस्पिटल ७ रुग्ण आढळले.
खाजगी प्रयोगशाळेत मंगळवारी मनपा २९८, अकोले ५, जामखेड ५, कर्जत ६, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ३५, नेवासा १९, पारनेर ४, पाथर्डी ३, राहाता ८१, राहुरी १४, संगमनेर ३०, शेवगाव २, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, कॅंटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्ह्यातील ७ रुग्ण आढळले.
अँटीजेन चाचणीत१४२१ जण बाधित आढळुन आले आहेत. यामध्ये मनपा ६०, अकोले ६८, जामखेड ९, कर्जत ११२, कोपरगाव २७५, नगर ग्रामीण ४०, नेवासा ८८, पारनेर ७०, पाथर्डी ७५, राहाता १०४, राहुरी १२६, संगमनेर ९१, शेवगाव ६२, श्रीगोंदा ८५, श्रीरामपूर १३९, कॅन्टोन्मेंट बोर्ड १४ व इतर जिल्ह्यातील ३ रुग्ण आहेत.
इतक्या जणांची कोरोनावर मात
मंगळवारी मनपा ५६८, अकोले ५२, जामखेड २, कर्जत २, कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ९०, नेवासा १७, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहाता १९५, राहुरी ७७, संगमनेर ९७, शेवगाव २०, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ७५, कॅन्टोन्मेंट २४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांना डिस्चार्ज दिला.
बरे झालेली रुग्ण संख्या - १,०५,१०१
उपचार सुरू असलेले रूग्ण - १४,२६४
आतापर्यंत एकूण मृत्यू - १३३४
एकूण रूग्ण संख्या - १,२०,६९९