नवी दिल्ली - महागाईनं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कारण आतापर्यंत चढत्या क्रमाने वाढत गेलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनं ही माहिती दिली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात आली आहे. घट झालेल्या किंमती बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर लागू होणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने ही माहिती दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत सिलिंडरच्या किंमतीत वाढ झालेली होती. १ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. केवळ दोन महिन्यांत प्रती सिलिंडर दरात १२५ रुपयांहून अधिक वाढ झाली.