पोलिसांनो ! मनोबल खचू देऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

मुंबई - कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. अनेक पोलिसांना देख्रील कोरोनाची लागण झाली आहे. तरीही आपल्या कर्तव्यापासून दूर हटले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच आपल्या अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये, प्रधान सचिव विनीत अग्रवाल, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

'या' त्रिसूत्रीचे पालन करा

जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन दिलीप वळसे यांनी यावेळी केले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !