शेवगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. परंतु, यामध्येही एका वेगळ्या सामाजिक कामामुळे मनसेचे शहरात चांगले कौतुक होत आहे. मनसेने खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा जपला, असे सर्वजण म्हणत आहेत.
गरजूंना दिला मदतीचा हात
यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी व मनसेचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. मनसेने शिवजयंती निम्मित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमात स्वाभिमाणिचे प्रशांत भराट, राहूल सांवत, गणेश डोमकावळे , ज्ञानेश्वर कुसळकर, दिलीप सुपारे, दिपेश पिटेकर, संजय वणवे, उपस्थित होते.
तसेच संदिप देशमुख, देविदास हुशार, रामेश्वर बलिया, संजय बडे, विठ्ठल दुधाळ, अभिजीत शेळके, निवृत्ती आधाट, बाळा वाघ,अमिन सय्यद, विनोद ठाणगे, सोमनाथ आधाट, राजू चव्हाण, बाळासाहेब शित्रे, सावता पुंड, मंगेश लोंढे, सुरज कुसळकर, विजय धनवडे, भाऊ बैरागी, बाळासाहेब फटांगरे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.